सोमवारी पुन्हा चार पॉजिटिव्ह

फुकटवाडीत 2 तर राजूर आणि वांजरी येथे प्रत्येकी 1

0 12

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत. आज आलेल्या अहवालानुसार 2 कोरोनाबाधित फुकटवाडीतील आहेत. तर राजूर येथे 1 आणि वांजरी येथे 1 रुग्ण आढळलेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 657 झाली आहे.

सोमवारी 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. आज 22 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अद्याप 53 अहवाल येणे बाकी आहेत. सध्या तालुक्यात एकूण 657 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 615 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 42 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 17 झाली आहे.

                                               आज 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 10 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 42 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 18 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 24 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 14 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 18 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.