वणीकर रंगले भगव्या रंगात… शहनाज अख्तर यांच्या भजन संध्येने भाविक मंत्रमुग्ध

17

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील शासकीय मैदानावर रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी शहनाज अख्तर यांची भजन संध्या रंगली. या भजन संध्येत हजारो श्रोते व भाविक उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव समितीद्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर संध्या 6 वाजता अमृत भवन येथे सुप्रसिद्ध धमाल विनोदी दोन अंकी नाटक एक डाव भटाचा या नाटकाचा शो होणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या धमाल शोचे लेखक सचिन मोटे व सचिन गोस्वामी या जोडगोळीने या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.

गायिका शहनाज अख्तर हिने सुप्रसिद्ध गीत ‘मुझे चढा है भगवा रंग’ यासह महादेव, श्रीराम यांचे भजन गाऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले. अनेक भजनावर भाविकांनी नाचून प्रतिसाद दिला. यावेळी जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण मैदान गुंजले होते. दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत विजय चोरडिया यांचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी खासदार हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, संजय निमकर, किरण दिकुंडवार, नीकेत गुप्ता यांचा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

आज रंगणार ‘एक डाव भटाचा’
अमृत भवन  येथे महाराष्ट्राची हास्यजत्रा या धमाल शोचे लेखक सचिन मोटे व सचिन गोस्वामी या जोडगोळीने लेखन व दिग्दर्शन केलेले एक डाव भटाचा हे नाटक होणार आहे. एक डाव भटाचा या नाटकाने सर्व रेकॉर्ड मोडले होते. तसेच या नाटकावर आलेला एक मराठी सिनेमा देखील चांगलाच गाजला आहे. या नाटकाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.