शिरपूर येथे वीज पडून गाय ठार

शेतकऱ्याचे दहा हजारांचे नुकसान

0 507

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिरपूर येथील एका शेतात सोमवारला दुपारच्या सुमारास वीज पडून एक गाय ठार झाल्याची घटना घडली. यात शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं आहे.

सोमवारी तालुक्यात दुपारी चार वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यावेळी शिरपूर येथील शेतकरी शंकर अर्जुना गुरनुले यांच्या शेतात वीज पडून त्यांच्या मालकीची पाच वर्षे वयाची गाय ठार झाली. गाईची किंमत 10 हजार रुपये असल्याचा अंदाज आहे.

पोलीस पाटील सुवर्णा उमेश बोंडे ,तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र वाभीटकर, ग्राम पंचायत सदस्य राघो टेकाम, लक्ष्मण काकडे, अनिल भोयर यांच्या समक्ष घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानी गायीचे शवविच्छेदन केले. गुरनुले यांनी शासकीय मदतीची मागणी केली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.