समता फाउंडेशन व महात्मे नेत्र रुग्णालयाद्वारा मोफत नेत्र तपासणी

शिंदोला येथे १८१ रुग्णांची झाली तपासणी, तर ९२ रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

0 472

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिंदोला येथे समता फाउंडेशन मुंबई आणि महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर झाले. यात १८१ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर ९२ रुग्णांवर नागपूर येथे शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

सदर शिबिर शिंदोला ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या सहकार्याने घेण्यात आले. यात नेत्रतज्ञ डॉ. प्रणिता साखरकर, डॉ. सुकन्या गोरे यांनी नेत्र तपासणी केली. आरोग्य परिचारिका शिल्पा उद्रके, ताई गाडगे, आरोग्य सहाय्यक अरुण कोंगरे, भाऊ दुर्गे, आरोग्यसेवक प्रमोद भाकरे यांनी यांनी सहकार्य केले.

तपासणी करून गरजूंना चष्मे देण्यात आले. १८१ रुग्णापैकी ९२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. त्यांच्यावर दि ५ ते ७ ऑगस्टला नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अजय हरणखेडे, निखील निमजे, आकाश मलकापूरे, गौरी दुधबरवे, उपसरपंच किशोर किनाके, प्रीतम बोबडे, तुकडोजी पिंपळशेंडे, ऋषी झाडे, सचिन बाभूळकर, हितेश ढवस, पुरुषोत्तम मोहितकर यांनी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.