रविवारी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण

अद्याप 762 रुग्णांचे अहवाल येणे बाकी

0 9

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 4 एप्रिल रोजी तालुक्यात 6 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 3 तर ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील तेली फैल येथे 2, स्वामी समर्थ नगर येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. तर चिखलगाव येथे 2 तर भालर टाऊनशिप येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.

आज यवतमाळ येथून एकही अहवाल प्राप्त नाही. आज 319 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 6 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 313 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 189 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 762 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 8 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली

सध्या तालुक्यात 123 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 51 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 46 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 26 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1583 रुग्ण आढळून आलेत. यातील 1583 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

खळबळजनक: डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.