क्रिकेट सट्ट्यावर वणी पोलिसांची धाड, दोघांना अटक

43

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील रंगारीपुरा येथे सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 2 जणांना अटक करण्यात आली तर सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. राजेश्वर सुरेश चापडे (35) रा. रंगनाथनगर व शिवा भारतभूषण शर्मा (28) रा. रंगारीपुरा यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे.

सध्या पाकिस्तान सुपर लीग सुरू आहे. या लीगमध्ये शुक्रवारी दिनांक 3 मार्च रोजी कराची विरुद्ध इस्लामाबाद हा क्रिकेट सामना सुरू होता. या सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलिसांनी रंगारीपुरा येथे धाड टाकली असता तिथे एलईडी टीव्हीवर सामना पाहून जुगार खेळला जात असल्याचे त्यांना आढळून आले.

या धाडीत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 4 मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही व इ साहित्य असा एकूण 1 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई ठाणेदार प्रदीप शिरस्कर, आशिष झिमटे, सुदर्शन वानोळे, डोमाजी भादीकर, सुहास मंदावार, हरिंद्रकुमार भारती, सागर सिडाम, शुभम सोनुले, पुरुषोत्तम डडमल, छाया उमरे इत्यादींनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.