निधन : प्रतिष्ठित युवा व्यापारी महावीर कोठारी यांचे हृदयघातामुळे निधन

आज सकाळी 9 वाजता मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार, जैन समाजामध्ये शोक

15

पुरुषोत्तम नवघरे, वणी : येथील प्रगतीनगर भागात वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित व्यापारी महावीरचंद धर्मीचंद कोठारी (48) यांचे शुक्रवार 30 सप्टें. रोजी सायंकाळी 4.30 वाजता दरम्यान निधन झाले. नागपूर येथे खाजगी इस्पितळात हृदयाची शस्त्रक्रिया दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली.

महावीर कोठारी यांचे वणी बाजार समितीमध्ये कापूस व धान्याची अडतचे काम होते. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयाचा त्रास जाणवला. त्यामुळे गुरूवार 29 सप्टें. रोजी नागपूर येथे एका खाजगी दवाखान्यात त्यांना भरती करण्यात आले. शुक्रवार 30 सप्टें. रोजी त्यांची एंजियोप्लास्टि शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेच्या काही वेळानंतर हृदयविकाराचा जोरदार धक्का बसून त्यांचे निधन झाले.

वणी येथील मोक्षधाम मध्ये आज शनिवार सकाळी 9 वाजता त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महावीर कोठारी यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, भाऊ व मोठ्या संख्येने आप्त कुटुंब आहे. महावीर कोठारी यांचे अकस्मात निधनामुळे त्यांचे मित्र परिवार व वणी येथील सकल जैन समाजमध्ये शोक व्याप्त झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.