जत्रा मैदान परिसरातून दुचाकीची चोरी

0 728

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास वणीतील जत्रा मैदान येथून काही भामट्यांच्या दुचाकी चोरी केल्याची घटना आहे. चोरी गेलेले वाहन ठेऊन वाहन चालक दीपक चौपाटीवर काही किरकोळ समान खरेदी करण्याकरिता गेले असता सदर घटना घडली. या चोरीबाबतवाहन चालकाने आज सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शनिवारी दुपारी बिरबल नीळकंठ वनकर (52) राहणार घुग्गुस हे वणी येथे काही कामानिमित्त आले होते. त्यांनी वणीतील जत्रा मैदान येथील हनुमान मंदिराजवळ आपली हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच 34 बी इ 4147 उभी ठेऊन काही सामान खरेदी करण्यासाठी दीपक चौपाटीवर गेले. थोडा वेळात येऊन बघितले असता ठेवलेल्या ठिकाणी वाहन दिसले नाही. त्यांनी सुरवातीला माहिती इकडे तिकडे माहिती केली. परंतु कुठेही काही पता लागला नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलाम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे. काही दिवसाअगोदारच सदर वाहन बिरबल यांच्या भावाने 58,640 रुपयात घुग्गुस येथून विकत घेतले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.