कोसारा येथे विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

सततच्या आत्महत्येने तालुका हादरला

0 12

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा येथील शेत शिवारात एका 22 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धम्मदीप दिवाकर वनकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार मंगळवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास मृतक धम्मदिप वनकर या तरूणाने विषारी औषध प्राशण करून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची फिर्याद वासुदेव टेनपे यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला दिली. मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्तेच कारण कळू शकले नाही. घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदिश मंडलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस नायक राजू टेकाम करीत आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.