मेंढोली येथे गरोदर मातेचा अकस्मात मृत्यू

उत्तरीय तपासणी नंतर उरकले अंत्यसंस्कार

0 14

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील मेंढोली येथे एका गरोदर मातेचा अकस्मात मृत्यू झाला. दि.1 मंगळवारी सकाळी ही दुःखदायक घटना घडली. सदर महिलेच्या अकस्मात मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार मीना विवेक मेश्राम (23) असे मृत महिलेचे नाव आहे. मीना गरोदर होती. तिला तपासणीसाठी वणीच्या नांदेपेरा रोडवरील एका खासगी दवाखान्यात दि.30 रविवारी नेले होते. तिची प्रकृती पाहता डॉक्टरांनी तिला उपचारासाठी भरती करण्याचा सल्ला दिला होता. परंतु काही अडचणीमुळे मीनाला भरती न करता घरच्या मंडळींनी गावाला नेले.

मंगळवारी सकाळी महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला उपचारासाठी शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. शिरपूर आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तपासणी दरम्यान उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मीनाला मृत घोषित केले.

प्रेताची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मीनाच्या पोटातील मृत अर्भक मुलीचे होते. मेंढोली येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मीनाच हे पाहिलंच बाळंतपण होत. नवीन बाळ घरात येणार या आनंदात मेश्राम कुटूंबीय होते. परंतु मिनाच्या अकस्मात निधनाने कुटूंबावर दुःख कोसळले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.