शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

0 666

सुशील ओझा, झरी: महसूलमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त झरी येथील ग्रामीण रुग्णालयात शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी आ. विश्वास नांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. झरी तालुका आदिवासी बहुल असून, अनेक गावापर्यत आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे गोरगरीब आदिवासी जनतेचे हाल होत असल्याचे पाहून शिवसेनेच्या वतीने रुग्णवाहिका घेण्यात आली.

रुग्णवाहिकेमुळे गोरगरीब आदिवासी जनतेला दिलासा मिळाला असून, जनतेला फायदा होणार आहे. यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत घुगुल, पंचायत समिती सदस्य प्रणिता घुगुल, विनोद उप्परवार, संतोष माहुरे, संदीप विचू, दुष्यांत उपरे, ज्योती बीजगूनवार, संजय बीजगूनवार, शेख हसन, सतीश आदेवार, अमजद शेख, शीतल पंधरे, फैजल शेख, सीताराम पिंगे, उमेश पंधरे, उमेश परताम, उषा धवस, शशिकला खडसे, सुरेखा भोयर, अनिल द्यागरलावर, विनोद टोंगे, वामन चंनावार, संतोष बुरेवार, अनिल डोंगरावार, बळवंत देवळवार, सुभाष तांदुलकर, पवन राऊत, वासुदेव देठे, विजय पनगटीवार, शंकर पाचभाई, महादेव पंधरे, जीवन उलमाले, संदीप उईके, दयाकर गेडाम, नाना सुगंधे, प्रशांत येटे, पवन नैताम, पांडुरंग भालेराव, गजानन भांडारवार , ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.