सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, भावाची हत्या करून आरोपी पसार

मारेगाव तालुक्यात घडला थरार, कु-हाडीने वार करून लहान भावाची हत्या

0 2,904

नागेश रायपुरे, मारेगाव: केवळ शुल्लक वादातून मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला कु-हाडीने मारून हत्या केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील झरी तालुक्यातील पालगाव (बोटोनी) येथे आज सोमावारी 1 जूनच्या सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान घडली. अशोक सीताराम आत्राम (43) असे मृतकाचे नाव असून वसंता सीताराम आत्राम (49) रा. पालगाव (बोटोनी) असे भावाची हत्या करणाऱ्या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार आरोपी वसंता आत्राम हा जनावरांच्या सामूहिक गोठ्यात झांज्या बांधत होता. दरम्यान मृतक अशोक आत्राम हा तिथे गेला. त्याने भाऊ वसंताला थोडी जागा सोडून झांज्या बांध असे सांगितले. या शुल्लक गोष्टीवरून या दोघांमधील वाद वाढत गेला. अखेर वाद विकोपाला जाऊन आरोपी वसंता आत्राम याने आपला लहान भाऊन अशोक याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. वार करताच अशोक खाली पडला. त्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला. त्या जागी माती टाकून वसंता घटना स्थळावरून फरार झाला.

मृतकाची पत्नी पुष्पा आत्राम ही कपडे धुण्या करिता गावातील नदीवर गेली असता, गावातील एका महिलेने नदीवर धावत जाऊन पुष्पाला ही घटना सांगितली. तिने लगेचे जखमी अवस्थेतील पती अशोकला पांढरकवडा येथे उपचारासाठी नेले. मात्र वाटेतच अशोक चा मृत्य झाला.

फिर्यादी मृतकाची पत्नी पुष्पा आत्राम हिचे बयानानुसार आरोपी वसंता आत्राम वर कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करून मारेगाव पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी करत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.