क्षुल्लक कारणावरून लाकडी दांड्याने मारहाण

तिघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

9

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पेटूर येथे 29 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने मारहाण करीत एकाला जखमी केले आहे. जखमीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर विविध कलमानुसार वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामचंद्र बोधडकर हे पेटून ता. वणी येथील रहिवासी असून यांच्या घराजवळ मुरलीधर भाऊराव बोढाले (45) राहतात. 29 एप्रिल रोजी सायंकाळी मुरलीधर हे रामचंद्र यांच्या घरासमोर येऊन शिविगाळ करत होता. रामचंद्र यांनी बाहेर येऊन विचारणा केल्यावर मुरलीधर यांनी रामचंद्र यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली व जखमी केले.

रामचंद्र यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. याचवेळी रामचंद्र यांची आई मध्यस्थी करण्यास आली तेव्हा तिलाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यानंतर आरोपीचा भाऊ राजू बोढाले व पत्नी मंगला बोढाले यांनीही येऊन शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

जखमीची पत्नी पुष्पलता बोढाले यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात मुरलीधर बोढाले, मंगला बोढाले व राजू बोढाले यांच्याविरुद्ध कलम 323, 324, 34, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.