मोक्षधाम सेवा समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर

मुन्नालाल तुगनायत अध्यक्ष तर विलास पारखी सचिव

8

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील मोक्षधाम सेवा समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात मुन्नालाल तुगनायत यांची अध्यक्षपदी तर विलास पारखी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. शनिवारी 27 एप्रिलला मोक्षधाम वणी येथे सभा घेण्यात आली. या सभेत व्यवस्थापन मंडळाची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे सर्व कार्यकरिणी अविरोध झाली.

कार्याध्यक्ष- सुरेश खिवंसरा, उपाध्यक्ष-सतिष पिंपळे, दिलीप खाडे, सचिव विलास पारखी, सहसचिव करण पटेल, सोमनाथ मदान, कोषाध्यक्ष राहूल लाल तर सदस्य म्हणून पांडूरंग लांजेवार, नंदकिशोर खत्री, चंदर फेरवाणी, रविन्द्र निखार, चंद्रकांत जोबनपूत्रा, गिरजाशंकर जोशी, महादेव बिलोरीया, अर्जुनदास आसवाणी, अशोक बतरा, सुरेश बन्सोड, सुरेश गटलेवार, दिलीप बिसमोरे, सुरज निकुरे, यांची निवड करण्यात आली ही निवड पुढील 5 वर्षांसाठी आहे. सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगेश कदम यांनी काम पाहले.

मोक्षधाम सेवा समिती वणी येथे २००४ पासून अविरत सेवा करीत आहे. आज पर्यंत नगर परिषद वणी, आमदार, खासदार व वणीकर जनतेच्या सहकार्याने सेवा समिती अनेक उपक्रम राबवून विकासासह नागरीकांना मोक्षधाम येथे सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यापूढे अनेक विकासशील उपक्रम राबविण्याचा नविन व्यवस्थापक मंडळाचा मानस आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.