निजामुद्दीन येथे गेलेल्या वणीतील तीन व्यक्ती आयसोलेशनमध्ये

वणीतील 5 व्यक्ती यवतमाळमध्ये आयसोलेशनमध्ये

0 13,180

जब्बार चीनी, वणी: दिल्लीच्या निजामुद्दीन येथे गेलेल्या वणीतील 3 व्यक्तींना आज यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये टाकण्यात आले. त्यासोबतच आणखी एका व्यक्तीला यवतमाळ येथे आयसोलेशनसाठी हलवण्यात आले. काल एका व्यक्तीला यवतमाळ येथे हलवण्यात आले होते. त्यामुळे वणीतून यवतमाळ येथे आयसोलेशनमध्ये एकूण 5 व्यक्ती गेल्या आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथे गेलेल्या तीन व्यक्तींमध्ये कोरोनाचे लक्षण आढळताच त्यांना तातडीने यवतमाळला हलवण्यात आले आहे. हे तिघेही वणीतील खरबडा परिसरातील आहेत. तर काल रवीनगर येथील जर्मनीतून परत आलेल्या एका व्यक्तीला आयसोलेशनसाठी हलवण्यत आले होते. यासह दिल्लीवरून आलेल्या एका व्यक्तीलाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

अद्याप एकही रुग्ण पॉजिटिव्ह नाही

सध्या या पाचही व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. रिपोर्ट आल्यावर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे स्पष्ट होईल.

दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात मरकजमधील तबलीघी जमातीत सहभागी होण्यासाठी लोक गोळा झाले होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळताच त्यातून दीड हजारांपेक्षा अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले होते. त्यात सुमारे साडेचारशे लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शिवाय येथील काही लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. यात वणीचे तिन लोक सहभागी होण्यासाठी गेले असल्याची चर्चा वणीमध्ये आहे. त्यामुळे वणी व परिसरात सध्या एकच खळबळ माजली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.