वंचित महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. काजोल गायकवाड

10

जितेंद्र कोठारी, वणी: वंचित बहुजन पक्ष महिला आघाडीच्या वणी तालुकाध्यक्षपदी डॉ. काजल गायकवाड (गवई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित महिला आघाडी जिल्हाध्यक्षा धमवंती वासनिक यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉ. काजोल या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग व तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी त्यांचे नियुक्ती पत्र देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शहराध्यक्ष किशोर मुन, कपिल मेश्राम, शंकर रामटेके, मिलिंद गायकवाड आदि उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.