मानोरा तालुक्यात ठिकठिकाणी सेवालाल महाराज जयंती साजरी

विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन

0 406

कारंजा: मानोरा तालुक्यातील अनेक गावामध्ये सद्गुरू संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. अनेक गावांमध्ये भागवत सप्ताह तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल दिग्रसचे संचालक तथा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे सरचिटणीस डॉ श्याम विजय जाधव (नाईक) यांनी परिसरातील अनेक गावांमध्ये जाऊन या आनंदमय सोहळ्याला भेट दिली तसेच समस्त गावकऱ्यांना व नागरिकांना सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

बंजारा काशी पोहरागड येथे संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस तर्फे मोफत तपासणी तसेच औषध वाटप करण्यात आले तसेच रुग्णसेवेसाठी अँम्बुलन्स सुविधा पूरवण्यात आली. भाविकांना प्राथमिक आरोग्य केंद्र पोहरादेवी तर्फे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

उमरीगड येथे जेतालाल महाराज मंदिर परिसरात सेवालाल महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तसेच विजय नाईक अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघ उपस्थित होते. त्यांनी सर्व भाविकांना सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच सेवालाल महाराजांचे विचार सर्वांनी आचरणात आणावे असे आवाहन केले.

या प्रसंगी प्रास्ताविक संत श्री आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस चे संचालक डॉ श्याम जाधव यांनी केले.

त्याचप्रमाणे फुलउमरी येथे श्री नंदीबाबा संस्थान वर सेवालाल महाराज जयंती भविकांनी अतिशय आनंदात साजरी केली. महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी घेतला तसेच माहुली या गावामध्ये डॉ श्याम जाधव यांनी सेवालाल महाराज जयंती उत्सवास भेट देऊन ग्रामस्थांना सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने डॉ श्याम जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.