आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

16

दिग्रस: शहरातील आरोग्यधाम हॉस्पिटल व दिग्रस अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यधाम हॉस्पिटल येथे 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 70 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आरोग्यधाम हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप दुधे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दि दिग्रस अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष तथा आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत रोकडे, संचालक डॉ.आशिष शेजपाल, संचालक डॉ. श्रीकृष्ण पाटील, डॉ. अक्षय खरात डॉ. नीलेश जाधव, डॉ. कल्पना जाधव, डॉ. प्रियंका जाधव, डॉ. अभय गोविंदवार, ग्रामीण रुग्णालय दिग्रसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज चव्हाण, डॉ. आशिष राठोड यांच्यासह हॉस्पिटल व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.