केवळ 1 रुपयामध्ये Xiaomi चा स्मार्टफोन

Anniversary Sale मध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स

0 371

नवी दिल्ली: Xiaomi कंपनी आता नवा धमाका करणार आहे. कंपनीने आपल्या Anniversary Sale मध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स सादर केल्या आहेत. हा सेल 20 आणि 21 जुलै रोजी सुरु राहणार आहे. यामध्ये एका फ्लॅश सेलचं आयोजन केलं आहे ज्यामध्ये ग्राहकांना केवळ 1 रुपयात स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.

भारतात श्याओमीचे तीन वर्ष पूर्ण झाल्यानं हा सेल आयोजित करण्यात आला आहे. या सेलमध्ये केवळ एका रुपयांत Redmi 4A स्मार्टफोन विकत घेण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीचं सोशल मीडियात प्रमोशनही करावं लागणार आहे.

सेलमध्ये कंपनी अनेक वस्तूंवर डिस्काउंट देणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना केवळ एक रुपयात स्मार्टफोन व पॉवरबँक यासारख्या वस्तू मिळणार आहेत. रेडमी 4A स्मार्टफोन, वायफाय राउटर 2, एम आय VR प्लेयर, 10,000 MAH पावरबँक व सेल्फी स्टीकसारख्या अन्य वस्तू 1 रुपयात मिळतील. तसेच MI च्या अन्य वस्तूवर 100 रुपयांपर्यंतची सूट मिळेल.

सोबतच कॅपसूल इयरफोनवर 100 रुपये आणि MI च्या हेडफोन्सवर 300 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. 1799 रुपयांत मिळणारा MI PRO -HD इयरफोन फक्त 1,599 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.