केवळ पाचशे रुपयात मिळणार जिओचा फोन

21 जुलैला फोन लाँच होण्याची शक्यता

0 407

मुंबई: फुकट नेट आणि कॉल देऊन रिलायन्स जिओनं आधी मोबाईल सर्विस सेवा देणा-या कंपनीचं तोंडचं पाणी पळवलं. आता जिओ फोन तयार कंपनीचं पाणी पळवायला तयार झाली आहे. रिलायंस जिओ आता केवळ पाचशे रुपयात फिचर फोन देणार आहे. रिलायन्स 4G VoLTE असं या फिचर फोनचं नाव आहे. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचं आयोजन 21 जुलैला करण्यात आलं आहे. याच बैठकीत फोन लाँच केला जाणाची शक्यता आहे.

फीचर्स काय असतील ?

‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल. 512 MB रॅम4 GB इंटर्नल स्टोरेजड्युअल सिम स्लॉट असेल. 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा असणार आहे. तर 2000mAhची बॅटरी या फोनला असणार आहे. यासोबतच या फोनमध्ये ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग ही सुविधा देखील दिली जाणार आहे.

काही रिपोर्टनुसार यामध्ये ‘KAI ओएस’ असेल. जे फायरफॉक्सचं कस्टमाईज व्हर्जन आहे. शिवाय यामध्ये हॉटस्पॉट टेदरिंगचाही पर्याय असेल. ज्यामुळे तुम्ही एका फोनवरुन अनेक फोनवर इंटरनेटचा वापर करु शकता.

केवळ 500 रुपये किंमत

21 जुलैला लाँच होणाऱ्या या 4G VoLTE फीचर फोनची किंमत 500 रुपये असेल, अशी माहिती आहे. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार या फोनची किंमत 500 रुपये आहे. जिओच्या फोनची किंमत 500 रुपये असेल, 2G ग्राहकांपर्यंत 4G सेवा पोहचवण्यासाठी ही किंमत ठेवण्यात आली आहे, असं HSBC चे टेलीकॉम अॅनालिस्ट राजीव शर्मा यांनी म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.