Browsing Tag

Wani

तीन दिवसीय धम्म परिषदचे राजूर येथे थाटात उद्घाटन

बंटी तामगाडगे, महेश लिपटे, राजूरः वणी तालुक्यातील राजूर येथे एप्रिल महिन्यात 28, 29 व 30 तारखांना धम्म परिषद आयोजित केली आहे. 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभा निमित्त आयोजित या धम्मपरिषदेचे उद्घाटन 28 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता डॉ.…

वणीत सोमवारी श्री नंदेश्वर देवस्थान येथे श्रद्धांजलीसभेचे आयोजन

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी:-  माजी आमदार बापूराव पाटील पानघाटे आणि रूधाजी पाटील देरकर या समाजधुरीणांचे वणी येथे अलीकडे निधन झाले. वणी, मारेगाव व झरी तालुक्यांतील शोकाकुल नागरिकांतर्फे सोमवार दि. 30 एप्रिलला श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात…

‘कभी हा तर कभी ना’ च्या चक्करमध्ये सामान्य जनतेची ससेहोलपट

सुशील ओझा, झरी:- तालुक्याचा बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या मुकुटबन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेवेने ग्राहकांची चांगलीच पायपीट वाढविली आहे. बँक ग्राहकांना सेवा देणारी एटीम सेवा सध्या 'कभी हा तर कभी ना' या…

पाण्याकरिता शेवटी त्याने सोडले अन्न

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषदेला पाईपलाईनचे काम करून देण्याबाबत अनेकदा तक्रारी, अर्ज तसेच विनंती सादर करण्यात आल्या. परंतु नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचारी  काम करण्यास प्रचंड उदासीनता दाखवीत आहेत. याबाबत उपोषणकर्ता दादाजी लटारी पोटे हे…

विजय उपाध्ये यांना विद्यापीठाचा सेवागौरव पुरस्कार.

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक विजय शंकरराव उपाध्ये ह्यांना ह्या वर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी वर्गवारीतील उत्कृष्ट सेवागौरव पुरस्कार घोषित झालेला आहे.…

बोअरवेल व पाईपलाईनच्या कामांसाठी खड्डे, अपघातांची शक्यता

अक्षय कवरासे, वणीः सध्या तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण सावट आहे. सामान्य जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने बोअरवेल आणि पाईपलाईनचे काम सुरू केले. या कामाकरिता शहरातील ढुमेनगर, ते गुरुनगर या भागात खड्डे करणे सुरू…

दादासाहेब कन्नमवार यांच्या पुतळ्याचे वणीतअनावरण

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शनिवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता हा सोहळा झाला. वणीकरांची मागील…

वणीत संस्कृत बालसंस्कार शिबिराची सांगता

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संस्कृत भारतीच्या वणी शाखेने प्रगतीनगर येथील किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये संस्कृत बालसंस्कार शिबिर घेतले. दिनांक १० एप्रिल ते२०एप्रिल या काळात घेण्यात आलेल्या या शिबिराची सांगता प्रा. म. गो. खाडे यांच्या…

वणीत जेसीआयची सायकल रेस गुरुवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः जेसीआय वणी सिटी झोन क्र 13 द्वारा गुरुवार 19 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता सायक्लॉथॉन या सायकल स्पर्धेचे पाण्याच्या टाकीच्या शासकीय मैदानापासून आयोजन करण्यात आले आहे. एकूण आठ किलोमिटर अंतराच्या या स्पर्धेत सहभागी…

कँडल मार्चने ढवळून निघाले वणी शहर

विवेक तोटेवार, वणी: जम्मू-काश्मिरात आठवर्षीय चिमुरडीच्या बलात्कारानंतर नराधमांनी निर्घृण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ वणी शहरात कँडल मार्च काढण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आसिफाला न्याय मिळवून देण्यासाठी वणीकर उत्स्फूर्तपणे…