Browsing Tag

Lead Story

वणी परिसरात विजेचा कहर, तिघांचा मृत्यू

रवि ढुमणे, वणी: रविवारी दुपारी अचानक आलेल्या पावसात विजेचे तांडव सुरु झाले. त्यात तिघेजण ठार तर एक बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वणी परिसरातील राजूर कॉलरी, मारेगाव तालुक्यातील वागदरा आणि झरीजामनी तालुक्यातील पाचपोर येथे…

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुकनेगाव, पळसोनीतील शिक्षिकेने पटकावले पारितोषिक

रवि ढुमणे, वणी: नुकत्याच झालेल्या राजस्तरीय निबंध स्पर्धेत सुकनेगाव व पळसोनी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेने जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. जीवन गौरव राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील जिल्हा…

मारेगाव तालुक्यात वीज कोसळून मालकासह बैलाचा मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील वागदरा जवळ गजरा पोड येथे रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान वीज कोसळून एक व्यक्तीसह बैलाचा मृत्यू झाला आहे. गजरा पोड वागदरा येथील शेतकरी गणेश बोतु आत्राम हा वागदरा शेतशिवारात बैल चारत असताना…

राजूर येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू

कुमार मोहरमपुरी, राजूर: वणी तालुक्यातील राजूर-वांजरी शिवेवर असलेले बेरार लाईम ह्या चुनाभट्टी परिसरात राहणारे व बकरी राखण करून गुजराण करणारे प्रेमानंद वानखेडे (७१) यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही घटना…

मारेगाव चे ग्रामीण रुग्णालय जिह्लातील सर्वात दुर्दैवी रुग्णालय: खा. हंसराज अहीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव:  आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयच जिल्ह्यातील सर्वात दुर्दैवी रुग्णालय असल्याचे मत खुद्द केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी रुग्णालयाला दिलेल्या भेटीत म्हटले आहे. या…

सुशगंगा पॉलिटेकनिक कॉलेजजवळ सापडली डेथ बॉडी

रवि ढुमणे, वणी: चंद्रपूर येथील नानाजी नगरात वास्तव्यास असलेल्या बस चालकाचा नायगाव शिवारातील सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज जवळ संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. चंद्रपुरातील नानाजी नगर भागात राहणारे चंद्रभान मारोती ढवस (५४) हे वरोरा डेपोत…

आर्यन कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात ग्राहकांचा आंदोलनाचा इशारा

विवेक तोटेवार, वणी: योगेश पंजाबी यांचे आर्यन कन्स्ट्रक्शन  नावाची कंपनी असून ते सदनिका बांधून विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांचा गणेशपूर येथे सर्वे क्रमांक 87/4 सदनिका क्रमांक 67 ते 72 क्षेत्रफळ 1176.62 चौरस मीटर असून त्यांचा सदर सदनिका…

वणी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देश पत्राची छाणनी पूर्ण

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची निवडणूक 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. बुधवारी नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यात 13 उमेदवारांनी त्यांचे नाव मागे घेतले आहे. सरपंच पदाकरिता 11 सदस्यांनी आपले नाव मागे घेतले. तर 11…

मारेगाव पोलिसांचे पथ संचालन

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील दुर्गा उत्सव आणि मोहरम हे उत्सव शांततेत पार पडावे यासाठी मारेगाव पोलिसांनी तालुक्यात तीन ठिकाणी पथसंचलन केले. वेगाव, नवरगाव आणि मारेगावात हे पथसंचनल करण्यात आले. ग्रामीण भागात पथसंचलन करण्याची…

शिक्षण अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे शिक्षिकेवर ‘अतिरिक्त’ची टांगती तलवार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे एका शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेला माध्यमिक शिक्षण अधिकारी चिंतामन वंजारी यांनी समायोजनासाठी  50 हजार रूपयांची मागणी केली, पण ती मागणी पूर्ण न केल्याने, शिक्षिकेच्या पतीवर संबंधित शिक्षण…