जनता कर्फ्यू अपडेट: चर्चेअंती कोणत्याही निर्णयाविना संपली बैठक

जब्बार चीनी, वणी: वणीतील वाढती रुग्णसंख्या व मृत्यू लक्षात घेऊन शहरात जनता कर्फ्यू लावावा का? याबाबत रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता शहरातील कल्याण मंडपम येथे बैठक घेण्यात आली. तिथे घनघोर चर्चा झाली. यात अधिकाधिक लोकांनी…

जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड कामाला अवैध रेतीचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथे खनिज विकासनिधीतून जिल्हा परिषद शाळेच्या कंपाउंडचे काम सुरू आहे. बांधकामाकरिता ठेकेदाराला बिना रॉयल्टी म्हणजेच अवैधरीत्या चार ब्रास रेती टाकण्यात आली. ही गुप्त माहिती महसूल विभागपर्यंत पोहचली. तलाठी…

सावधान… विनामास्क फिरणा-या 64 व्यक्तींवर कार्यवाही

विवेक तोटेवार, वणी: जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी शनिवारी रात्री विनामास्क फिरणा-यांवर 500 रुपये दंड आकारण्याचे आदेश दिलेत. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात आज…

कोरोनाचा हाहाकार… आज 41 पॉजिटिव्ह तर दोघांचा मृत्यू….

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी कोरोनाने हाहाकार माजवला. रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेत. आज तालुक्यात तब्बल 41 रुग्ण आढळलेत तर 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. याशिवाय आज कोरोनाने रुग्णसंख्येचा 400 चा पल्ला…

वेडड येथे पाच तर जामनी येथे सात कोरोनाबाधित रुग्ण

सुशील ओझा, झरी; तालुक्यातील वेडद येथे ५ तर जामनी येथे ७ रुग्ण आढळल्याने तालुक्यात रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली. दोन दिवसांत तालुक्यात १६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. वेडद येथे ५ रुग्ण लिंगटी ३ व येदलापूर येथे १ अशी वाढ झाली. तालुक्यात…

मुकुटबन येथील बाजारपेठ मंगळवारपासून कडकडीत बंद

सुशील ओझा, झरी: मुकुटबनसह परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ते पाहता मुकुटबन शहराला कोरोनाचा आजारापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने मुकुटबन व्यापारी असोसिएशनने संपूर्ण बाजारपेठ मंगळवारपासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १३ सप्टेंबर…

सुप्रसिद्ध जादूगर तेजा यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: राजूर येथील रहिवाशी असलेले व विदर्भातील सुप्रसिद्ध जादूगर तेजकुमार परशराम उर्फ जादूगर तेजा यांचे शनिवारी रात्री चंद्रपूर येथे निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात आजारी असल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी…

लोढा हॉस्पिटल येथे सुरू होणार डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 7 खासगी रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यात वणीतील लोढा हॉस्पिटलचाही समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून खासगी कोविड केअर…

वणीत आज जनता कर्फ्यूसंदर्भात महत्त्वाची बैठक

जब्बार चीनी, वणी: शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी वणीत जनता कर्फ्यूबाबत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. आंबेडकर चौक…

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज 12 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: गुरुवारी 6 रुग्ण आढळल्यानंतर आज रविवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी तालुक्यात 12 रुग्ण आढळले आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये मारेगाव शहरातील 5 तर ग्रामीण भागातील 7 रुग्ण आहेत. कोरोनाने मार्डी, कोलगाव, पिसगाव, बोटोणी येथे…