अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनानिमित्त पोहा येथे महाआरोग्य शिबिर

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांची तपासणी

0 527

कारंजा: तालुक्यातील पोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी दिनांक 18 जुलै रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत घेण्यात आले. संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक डॉ श्याम विजय जाधव (नाईक) यांच्या मार्गदर्शनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त या मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 267 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यात परिसरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांवर रुग्णांची तपासणी केली.

या वेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजने बद्दल यथोचित मार्गदर्शन केले तसेच आपल्या आरोग्याची निगा कशी राखावी व आरोग्यमय जीवन शैली कशी अंगिकारावी याविषयी मार्गदर्शन केले. या महाआरोग्य शिबिराला पोहा गावचे सरपंच डॉ शरदराव दहातोंडे, विजय नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ यु. यु. जाधव,पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध जाधव, संजय जाधव उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले योजनेची माहिती देताना डॉ. श्याम जाधव (नाईक)

महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पिवळे तसेच केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाला वार्षिक दिड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाते. यात 971 प्रकारच्या आजार व 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. यामध्ये डायलिसीस, मेंदुविकार, हृदयरोग, हाडांचे आजार, किडनीचे आजार, कान-नाक-घशाचे आजार, महागड्या शस्त्रक्रिया यांचा समावेश आहेत. तसेच यात रुग्णांना मोफत औषधीही दिली जाते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.