कोरोनाचा पुन्हा कहर सुरू… आज 14 रुग्ण

गेल्या 4 दिवसात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ

0 13

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये आर-टीपीसीआर टेस्टनुसार 6 तर रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार 8 पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी कुरई येथे 7 रुग्ण, सुंदर नगर येथे 4 रुग्ण, तर शहरातील टागोर चौक, जत्रा रोड व रंगारीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण 724 रुग्ण झालेत. तालुक्यात कोरोना रुग्णांचा दर कमी झाला असताना अचानक रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. 

आज यवतमाळहून 32 अहवाल प्राप्त झाले. यात 6 पॉजिटिव्ह तर 26 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 31 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 8 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 23 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 52 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 100 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 53 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 724 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 670 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 3 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 53 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 22 जण होम आयसोलेट आहेत. 20 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 11 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

चार दिवसात रुग्णसंख्येत अचानक वाढ
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना गेल्या चार दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. आज एकाच दिवशी तब्बल 14 रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण भागातील संख्या अधिक आहे. सुंदरनगरमध्ये सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे तर आज कुरईमध्ये तब्बल 7 रुग्ण आढळून आले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.