सचिन सूर्यवंशी व्यापारी आघाडीचे जिल्हा सहसंयोजक 

भाजपा जिल्हाध्यक्षांनी दिले नियुक्तीपत्र, चाहत्यांमधे उत्साह

0 186

बहुगुणी डेस्क, अमरावतीः भारतीय जनता पार्टीच्या भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा सहसंयोजक म्हणून सचिन शंकरराव सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी तसे नियुक्तीपत्र दिले. व्यापारीवर्गात सूर्यवंशी यांच्या कार्याचा आवाका बघता पक्षाने यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.

सचिन सूर्यवंशी हे मूळ यवतमाळ जिल्ह्यातील नेरचे. यांचा दर्यापूर येथे व्यवसाय आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रमांत कार्यरत आहेत. विविध क्षेत्रांतील त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचा आलेख पाहता पक्षाने ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या नियुक्तीसाठी त्यांच्या चाहत्यांमधे आनंद व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.