बस आणि ओमनीची धडक, एक जागीच ठार, एक जखमी

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाच्या परभणी-चंद्रपूर या बस आणि मारुती ओमनीला अपघात झाला. वणी वरोरा रोडवरील सुशगंगा पॉलीटेकनिक जवळ हा अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.…

अडेगावमध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी

देव येवले, मुकुटबन: बिरसा ब्रिगेड, शिव महोत्सव समिती , संभाजी ब्रिगेड, प्रशिक बौद्ध मंडळ, जैन बांधव, यांच्या तर्फे आदिवासी जननायक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्याख्यान आणि आदिवासी सांस्कृतिक…

मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी फिरविली सीसीआय खरेदीकडे पाठ

ज्योतिबा पोटे, मारेगाव: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला शासन कवडीमोल भाव देत आहे. तसंच सीसीआय खरेदी केंद्रावर होत असलेली भावासंदर्भात तफावत यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे येथे सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे…

आज वणीत प्रसिद्ध नाटककार ठेंगडी यांचे व्याख्यान

सुनील बोर्डे, वणी: स्थानिक विदर्भ साहित्य संघ शाखेच्या वतीने प्रसिद्ध नाटककार व दिग्दर्शक प्रभाकर ठेंगडी ( नागपूर ) यांचे व्याख्यान दि. 17 नोव्हेंबर, शुक्रवार रोजी रात्री 7 वाजता नगर वाचनालय सभागृहात आयोजिण्यात आले आहे. स्व. वामनराव…

सावधान ! मुकूटबन परिसरात दिसला वाघ दिसला…

रफिक कनोजे, मुकुटबन: झरी तालुक्यातील मुकूटबन परिसरातील शिवारात गुरुवारी संध्याकाळी शेतकऱ्यांना वाघ दिसला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. परिणामी वनविभागाने जंगलात, शिवारात ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. झरी…

प्रवीण खानझोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वणी: जाती, धर्म बाजुला सारून केवळ माणसाला माणूस म्हणून बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके आहेत. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे. मात्र फुले शाहु आंबेडकरी विचारांची कास धरून आज सामाजिक आणि राजकीय…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणारा पोलिसांच्या जाळ्यात 

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रांगणा येथील दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्याला वणी पोलिसांनी सहा महिन्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तालुक्यातील रांगणा येथील १६ वर्षीय विद्यार्थिनी जवळच…

अन् जाणता राजा थांबलेच नाही…

ज्योतिबा पोटे, मारेगाव: माजी कृषीमंत्री शरद पवार सध्या विदर्भ दौ-यावर आहेत. दि.१६ नोव्हेंबर गुरुवारला ते यवतमाळ जिल्ह्याला भेट देणार असल्यानं ते गडचिरोली वरुन मारेगाव मार्गे यवतमाळला गेले. त्या वेळेस शेतकरी त्यांची वाट पाहत बसले होते.…

अश्लिल क्लिप प्रकरण: आणखी एक राजकीय पदाधिकारी अडकण्याची शक्यता

रवि ढुमणे, वणी: सध्या वणी शहरात एका महिलेचे लैंगिक शोषण करून तिचा व्हिडीओ तयार केल्याच्या प्रकरणानं चांगलीच खळबळ उडवली आहे. या प्रकरणात राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी भास्कर गोरे याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात सदर व्हिडीओ तयार…

कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

शिंदोला: वणी तालुक्यातील कोलगाव (साखरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आहे. परिणामी रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसत खासगी दवाखान्यात उपचार करावे लागते. त्यामुळे आरोग्य विभागाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. कोलगाव…