वणीतील कोर्टाला मिळणार नवीन सुसज्ज इमारत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 67 कोटी 35 लाख खर्चास शासनाकडून शुक्रवारी प्रशासकीय मान्यता मिळाली, अशी माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. शहराची वाढती…

इन्स्टाग्रामवरून ओळख… शाळेतील मुलगी 9 आठवड्याची गर्भवती

वणी बहुगुणी डेस्क: सोशल मीडियावरून शाळेतील एका कुमारिकेची एका तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग आणि नंतर फोनवर संपर्क सुरु झाला. पुढे त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. एके दिवशी तरुणाने कुमारिकेसोबत अत्याचार केला. त्यानंतर प्रियकर…

मंगळवारी जैन ले आऊटमध्ये सत्यपाल महाराज यांचे कीर्तन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता शहरातील जैन ले आऊट येथील माऊली मंदिर परिसरात सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या…

उच्चशिक्षणाचा जागर करणा-या शिक्षणयात्रेला आजपासून वणीतून सुरुवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ जिल्हा मागासलेला आहे. त्यातही वणी उपविभाग हा आदिवासी बहुल आहे. परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना राज्यातील तसेच देश-विदेशातील नामांकित विद्यापीठ, शिक्षण संस्था यात प्रवेश घ्यायचा असतो. मात्र त्यासाठी असलेली प्रवेश…

पुरड (पुनवट) येथे दोन कुटुंबात राडा, बाप-लेक जखमी

वणी बहुगुणी डेस्क: तालुक्यातील पुरड (पुनवट) येथे गुरुवारी संध्याकाळी दोन कुटुंबांमध्ये चांगलाच राडा झाला. जुन्या भांडणातून एका कुटुंबाने दुस-या कुटुंबावर काठीने हल्ला. यात बापलेक जखमी झाले. या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल…

कबड्डी पाहण्यास गेलेल्या व्यक्तीला सेंट्रींग ठोकण्याच्या हातोडीने मारहाण

वणी बहुगुणी डेस्क: कबड्डी सामने पाहायला गेलेल्या एका व्यक्तीला गावातीलच एका तरुणाने हातोडीने मारहाण केली. भालर येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. राजू प्रभाकर बोबडे (38) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वणी…

आठवडी बाजार करायला गेलेल्या व्यक्तीची दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: आठवडी बाजाराला गेलेल्या एका व्यक्तीची दीपक चौपाटी परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केली. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. वणीत सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे. कधी दुचाकी चोरी, तर कधी घरफोडी…

नोकरी आणि पैशावर दावा करणा-या तोतया पत्नीवर गुन्हा दाखल

निकेश जिलठे, वणी: मंडपात लग्न सोहळा सुरू असतो... त्याच वेळी अचानक लग्नात एक महिला अंगाखांद्यावर दोन मुलं घेऊन येते...  आणि म्हणते... हे लग्न थांबवा... कारण नवरदेवाशी माझे आधीच लग्न झाले आहे... ही दोन मुलं नवरदेवाची आहे, हा सिन आपण सिनेमात…

भरधाव ट्रकने चिरडले महिलेला, महिलेचा जागीच मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वडगाव टी-पॉइंटजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव ट्रकचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दिनांक 5 जानेवारी रोजी 11.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. छबुताई उत्तम भोंगळे (57) असे मृत…

बॉक्स ऑफिस दणाणून सोडणारा सालार आजपासून वणीत

बहुगुणी डेस्क, वणी: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. 'सालार' या सिनेमाला देशभरातील सिनेप्रेमींचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सुपरस्टार प्रभास आणि श्रुती हासन अभिनीत 'सालार' या…