26 जानेवारीला वणीत रंगणार आंतर शालेय नृत्य स्पर्धा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने 26 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता आंतर शालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण प्रसारक मंडळ (एसपीएम) विद्यालयाच्या रंगमंचावर ही नृत्य स्पर्धा…

संजय देरकर… संघर्षाच्या वाटेवरील एक लढाऊ योद्धा

''निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ'' संत तुकाराम महाराजांच्या या उक्ती सांगतात की एखादे कार्य करताना अपयश येईल, मात्र दृढ निश्चयाने जर कोणते कार्य केले; तर ते नक्कीच तडीस जाते. हेच आपल्या कार्यातून दाखवणारे नेते म्हणजे संजय देरकर. अनेकदा…

आधी जमिनीचा मोबदला, नंतरच काम.. विजय पिदूरकर यांची मागणी

वणी बहुगुणी, डेस्क: मुंगोली खाण विस्तारीकरणासाठी मुंगोली, शिवणी येथील शेतक-यांच्या जमिनी घेण्यात आल्या. याचा मोबदला म्हणून वेकोलिने अद्यापही पूनर्वसन लाभ दिला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी अद्यापही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. उलट…

ठाणेदार अजीत जाधव यांची बदली

बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अजीत जाधव यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे. तर वणी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांची पांढरकवडा येथे बदली करण्यात आली. शिरपूर पोलीस ठाण्यात कार्यरत…

दारू पिल्यानंतर ‘तू मेरा भाई है’ डॉयलॉग मारल्याने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दारु पिले की अनेकांना फिल्मी डायलॉग सुचतात. कुणी 'आज गाडी तेरा भाई चलाएगा' म्हणतो. तर कुणी 'तू मेरा भाई है' म्हणतो. दारु पिल्यानंतर झालेल्या अशाच वायफळ डायलॉगबाजीतून वाद झाला. वादातून दोन भावांनी  एकाला जबर मारहाण करत…

कोंबड बाजारावर धाड, 7 जुगारी अटकेत

बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोडपाखिंडी लगतच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर एलसीबीच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत सात जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून २ लाख २५ हजार ८६० रुपयांचा…

वणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील महात्मा फुले चौकातील एका 43 वर्षीय इसमाने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. कुणाल पुरुषोत्तम मोडक (43) असे मृताचे नाव आहे. कुणाल हे मजुरी…

लालगुडा चौपाटीजवळ अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

निकेश जिलठे, वणी: एका भरधाव अज्ञात वाहनाने एका तरुणाला चिरडले. यात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास लालगुडा चौपाटी येथे ही घटना घडली. मंगेश ऋषीकेश बोरीकर (अंदाजे 37) असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात इतका…

रेतीची अवैधरित्या वाहतूक, ट्रकचालकावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: 12 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक पकडला. लालगुडा चौफुलीवर ही कारवाई करण्यतद आली. हा ट्रक घुग्गुस येथून वणी येथे येत होता. या कारवाईत वाहन चालकावर गुन्हा…

देवरावजी गव्हाने यांचे आज पहाटे निधन

पुरुषोत्तम नवघऱे, वणी: भाग्यशाली नगर येथील रहिवासी असलेले देवराव गव्हाणे यांचे आज पहाटे 5 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मनमिळावू स्वभावाचे धनी अशी त्यांची ओळख होती. प्रेरणा स्टुडिओचे संचालक राजू व विजय देवरावजी…