योजना तळागाळात पोहोचवणे हेच ध्येय: मंत्री हरदीप सिंग पुरी

विवेक तोटेवार, वणी: भाजप सरकार ही एक लोकांच्या नजरेत एक चांगले सरकार म्हणून समोर येत आहे. सत्तेत राहून जे करायला पाहिजे तेच आम्ही करीत आहो. शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवणे हेच सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री हरदीप सिंग…

रामनामात रंगली वणी, अयोध्येतील सोहळ्याचा जल्लोष

बहुगुणी डेस्क, वणी: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी पहाटे पासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढण्यात आल्या. मंदिरात भजन, कीर्तनाचे सूर कानी चढू लागले. अयोध्येत…

साक्षी बनणार इंजिनियर.. संजय खाडे यांचा मदतीचा हात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: साक्षी ही गरीब कुटुंबातून आली. मात्र अभ्यासात ती हुषार होती. नुकतीच ती 12 वी झाली. तिला इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला. मात्र आर्थिक समस्येमुळे तिचा प्रवेश थांबला होता. अखेर साक्षीच्या शिक्षणासाठी संजय खाडे यांनी मदतीचा…

शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शेतातील शेतमाल चोरणा-या एका टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने केला आहे. या प्रकरणी वांजरी येथील 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 70 हजारांचा शेतमाल आणि 70 हजारांची मोटार सायकल जप्त करण्यात…

नेत्रदोष असणाऱ्यांना नवी दृष्टी, दर महिन्याला दोन मोफत ऑपरेशन

वणी बहुगुणी डेस्क: स्माईल फाउंडेशनने 'नवी दृष्टी' हा नवा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत प्रत्येक महिन्याला वणीतील ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ डॉ. अनिकेत अलोणे हे दोन ऑपरेशन मोफत करणार आहेत. मोतीबिंदू, तिरळेपणा किंवा ऑपरेशनयोग्य जे काही…

ICSI या प्रतिष्ठीत संस्थेच्या उपाध्यक्षपदी वणीचे मोहीत बत्रा

वणी बहुगुणी डेस्क: आईसीएसआईच्या नागपूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी सीएस भावेश थदानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मुळचे वणीचे असलेले सीएस मोहित बत्रा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सीएस सुमित खिचा यांची सचिव तर सीएस दिशा श्रॉफ…

आज वणीतील प्राचीन हेमाडपंथी काळाराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवारी अयोध्या येथे श्रीरामलल्ला विराजमान व मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. या निमित्ताने श्री काळाराम मंदिर, रामपुरा वणी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या…

शुल्लक कारणावरून आई व मुलीत वाद, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शालेय शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीत व आईत शुल्लक कारणावरून वाद झाला. या शुल्लक कारणाने आलेल्या रागातून अल्पवयीन मुलीने थेट आत्महत्येचेच पाऊल उचलले. तालुक्यातील रासा शेत शिवारात ही घटना घडली. ज्योत्स्ना आत्राम (14) असे…

श्री काशी शिवपुराण कथेसाठी तयारी पूर्ण

बहुगुणी डेस्क, वणी: श्री काशी शिवपुराण कथेची सर्व तयारी पूर्ण झाली असून सध्या कथा स्थळी लागणा-या स्टॉलसाठी बुकिंग सुरू आहे. ही संपूर्ण कथा भाविकांसाठी मोफत असून विशेष म्हणजे बाहेरगावाहून येणा-या भाविकांसाठी आयोजकांतर्फे राहण्याची व जेवणाची…

थाप मारून थापाड्या गेला… 3 लाखांचा गंडा घालून गेला…

बहुगुणी डेस्क, वणी: एखादी मोठी व्यक्ती बोलत आहे असे भासवून व्यापा-याला मोठी ऑर्डर करायची आणि त्यानंतर त्याला गंडवायचे. असे अनेक सिन आपण सिनेमात बघतो. मात्र असाच काहीसा प्रकार वणीतील एका व्यापा-यासोबत घडला. शहरातील एका सुप्रसिद्ध डॉक्टर…