सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनतर्फे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी तर्फे शहरातील सर्व प्रशासकीय अधिका-यांना राखी बांधून ओवळणीत स्त्री रक्षणाची हमी मागण्यात आली. सध्या देशात महिल संरक्षणचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला अत्याचारासंबंधी कठोर शासन होत नाही. अधिका-यांनी महिलांशी एक भाऊ म्हणून कायम पाठीशी असावे यासाठी सन्मान तर्फे वणीतील सर्व प्रशासकीय कार्यालयात जाऊन तेथील अधिका-यांना राखी बांधण्यात आली. यावेळी सन्मान स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका किरण देरकर, शारदा चिंतकुंटलावार, वैशाली देठे, सुरेखा ढेंगळे, वृषाली खानझोडे, अर्चना पिदुरकर, मीनाक्षी मोहिते, संजीवनी खीरटकर इत्यादी महिला उपस्थित होत्या.

Kiran DerkarLead Story