अल्पवयीन मुलगी बलात्कार प्रकरण: आरोपी नराधमाला अटक

बलात्कार करण्यास सहकार्य करणा-या दोन महिलांना आधीच अटक
वणी: वणीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम रंगा चिंतलवारला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आधीच रंगाला सहकार्/ करणा-या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. रंगा सध्या एका चोरीच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. पोलिसांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करून रंगाला ताब्यात घेऊन या बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

 

काय आहे हे प्रकरण ?

मुकूटबन येथील गोडावून जवळ पीडित तरुणी वास्तव्यास आहे. तिचं कुटुंब मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती सध्या ह्यात नाही. 13 वर्षीय मुलीचे आईवडील मरण पावल्यानं ती सध्या तिच्या मोठ्या बहीणीकडे वणीला आली होती. मोठी बहीण शहरातील सार्वजनिक दुरभाष केंद्र कार्यालयाजवळ राहते. तिथेच रंगा शंकर चिंतलवार व शारदा रंगा चिंतलवार हे जोडपे राहतात. हे सर्व भंगार वस्तू गोळा करण्याचं काम करतात.

एक दिवस पीडितेवर रंगाचा डोळा गेला. त्यानं या सोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. बालिकेनं त्याला नकार देताच शारदानं तिला मारहाण करून बळजबरीने नवरा जसं करेल तसं करत जा, असं धमकावलं. त्यानंतर नेहमी धमकावून पीडितेचं या नराधमानं तिचं शोषण केलं. अशी तक्रार आजीनं केलीये.

परिणामी पीडिता गरोदर राहीली. गरोदर झाल्यानंतर शारदा रंगा चिंतलवार हीने रंगाला विरोध केला, पण वासनेत पागल झालेल्या रंगानं तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता मुकाट्याने हा अत्याचार सहन करत होती.

(पसार झालेला चोरटा वणी पोलिसांच्या जाळ्यात)

दरम्यान पीडितेची आजी वणीला आली. तिला तिच्या नातीचं पोट मोठं दिसलं. तिनं याबाबत तिला विचारणा केल्यावर तिनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. सध्या ती आठ महिण्यांची गरोदर आहे. हा सर्व प्रकार रंगा शंकर चिंतलवार आणि शारदा रंगा चिंतलवार यांनी संगणमताने व बळजबरीने केला असल्याचं नातीनं आजीला सांगताच आजीनं पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार पोलीसात नोंदविली आहे.

 

 

 

Lead StoryMinor girlRanga ChintalwarRapeWani police
Comments (0)
Add Comment