नेर अर्बन बँकेचा तिसरा वर्धापन दिन साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणीतील नेर अर्बन को. ऑप. क्रेडिट बँकेच्या वणी शाखेचा तुतीय वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सोमवारी झालेल्या या कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी सुनील कातकडे होते तर म्हणून उद्घाटक गोविंदराव थेरे उपस्थित होते.

या कार्यक्रमात बँकेचे प्रगती व लेखाजोखा आणि बँकेची सेवा या सर्व विषयांवर सर्व मान्यवरांनी माहिती दिली. कार्यक्रमाला संचालक चंदू मानतुटे, रमेश बघमारे, वणी शाखा व्यवस्थापक प्रमोद गजरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी नेर अर्बन वणी शाखेचे सर्व कर्मचारी, सर्व दैनिक अभीकर्ते व बँकेचे सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन विकास देवतळे यांनी केले. प्रस्ताविक संकेत उलमाले तर आभार सतीश झंझाळ यांनी केले. नेर अर्बन क्रेडीत को. ही बँक 9 ऑगस्ट 2002 ला स्थापन करण्यात आली. नरेंद्र गद्रे हे या बँकेचे संस्थापक आहे. 7 होतकरू मित्रांनी एका छोट्याशा ब्लॉकमधून या बँकेची स्थापना केली. आज यवतमाळ जिल्ह्यात पाच शाखा आहेत. तर बँकेची वार्षिक उलाढाल ही 375 कोटींची आहे. स्थापना झाल्यापासून ही बँक ऑडित ‘अ’ वर्गात आहे.

Lead Storyner urban bank
Comments (0)
Add Comment