गयाबाई देवरावजी गव्हाणे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते राजू गव्हाणे यांना मातृशोक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते व प्रेरणा स्टुडिओचे संचालक राजू देवरावजी गव्हाणे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई गयाबाई देवरावजी गव्हाणे यांचे वयाच्या 70 वर्षी निधन झाले. त्यांनी दिनांक शुक्रवारी 30 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.

मनमिळाऊ स्वभाव असलेल्या गयाबाई यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. आज दिनांक 31 ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गयाबाई यांच्या पश्चात पती, मुलं, मुली, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Gayabai GavhaneLead Story
Comments (0)
Add Comment