मारेगाव तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

आज अवघा 1 पॉझिटिव्ह, कोरोना रुग्णात सातत्याने घट

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात शहर वगळता आता ग्रामीण भागात ही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 31 मे रोजी तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. यात एका ग्रामीण भागातील महिलेला समावेश आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात 101 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज आरोग्य विभागाने 43 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात केवळ एक पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच आज 162 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणी करिता पाठवण्यात आले. अद्याप 312 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यात सध्या 101 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 20 रुग्ण उपचार घेत आहे तर 70 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 5 तर 6 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

हे देखील वाचा:

अत्यावश्यक सेवेत नसणा-या एकल दुकानांना परवानगी

Corona Update MaregaonLead Story
Comments (0)
Add Comment