सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील शेतकऱ्याने किटकनाशक आत्महत्या केल्याची घटना घडली. ३० मार्च रोज रात्री घडली. भूमन्ना लिंगन्ना मंदुलवार वय ३० वर्ष असे या शेतक-याचे नाव आहे. त्याने स्वतःच्या शेतात विष पिऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली.
आज सकाळी ही घटना उघडकीस आली. याची माहिती मुकूटबन पोलिसांना देताच महिला जमादार रंजना सोयाम व स्वप्नील बेलखेडे हे पोहचले पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करिता पाठविले. आत्महत्या करण्यामागचे कर कळू शकले नाही. मृतकाचे मागे आई वडील पत्नी असा आप्त परिवार असून पुढील तपास वरील दोन्ही कर्मचारी करीत आहे.
Attachments area