आज तालु्क्यात कोरोनाचा 1 रुग्ण

तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली...

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचा केवळ 1 रुग्ण आढळून आला. आज आलेला रुग्ण रॅपीड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आहेत. हा रुग्ण चिखलगाव परिसरातील साधनकरवाडीतील आहे. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णामुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 764 झाली आहेत. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

आज 8 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. आज 12 संशयितांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 52 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 18 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 764 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 743 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेल्या 2 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 18 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 9 जण होम आयसोलेट आहेत. 5 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 4 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी होतोय
तालुक्यात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 18 पर्यंत आला. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करतोय. हा आकडा पुन्हा कमी होताना दिसत आहे. आता तालुक्यात 18 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसेंदिवस आकडा कमी होत असल्याने तालुक्यातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळतोय.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

COronaCovid 19fridayLead StoryReportupdate
Comments (0)
Add Comment