मारेगावात BSNL ची सेवा विस्कळीत

पंधरा दिवसांपासुन ग्राहक त्रस्त, बँकेला फटका

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील बीएसएनची सेवा गेल्या 15 दिवसांपासून विस्कळीत त्यामुळे ग्राहक चांगलेच त्रस्त झाले आहेत. मारेगाव येथील बँक मध्येही बीएसएनएलची लिंक आहे. पण सेवा विस्कळीत झाल्याने लिंक वारंवार फेल होत आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प पडत आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

बी.एस.एन.एल.हे शासन पुरस्कृत कंपनी आहे. मारेगावात इतर खासगी कंपनीच्या टेलिकॉम सेवा देखील आहेत. मात्र इतर कंपनीला फायदा करण्यासाठी तर सेवा विस्कळीत केली जात नाही ना अशी शंका मारेगाव तालुक्यातील ग्राहक करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी येथील स्टेट बँकेतील लिंक पाच दिवस नव्हती. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला. लिंक फेल मुळे स्टेट बँक चक्क पाच दिवस बंद राहिली. यापुढे चांगली सेवा दिली नाही तर मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा ग्राहकांनी दिला आहे.

Maregaonstate bank of india
Comments (0)
Add Comment