दहेगावच्या शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

तालुका प्रतिनिधी, वणी: दहेगाव (घोन्सा) येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. सदर घटना (दि.30) बुधवारी सायंकाळी घडली. देवराव पांडुरंग ठावरी (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

वणी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी देवराव ठावरी यांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घरी कीटकनाशक प्राशन केले. त्यांना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

मृत शेतकऱ्याकडे दोन एकर जमीन आहे. त्याच्या मागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा आणि आप्त परिवार आहे. परिसरातील सततच्या आत्महत्या ह्या चिंतेचं कारण होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

DahegaonFarmerGhonsaLead StoryPoisonSuicide
Comments (0)
Add Comment