वणीतील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

माजरी जवळील जंगलातली घटना, कारण अस्पष्ट

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे राहणाऱ्या इसमाने 30 ऑगस्ट रोजी माजरी जवळील जंगलात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. सदर व्यक्ती हा दुचाकीवर लसूण विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. आत्महत्येचे कारण अजूनही संजू शकले नाही.

शिवाजी भगत भिसे (32) हे मृतकाचे नाव आहे. 30 ऑगस्ट रोजी सकाळी तो घरून व्यवसाय करण्यासाठी निघून गेल्याची माहिती आहे. काही वेळाने त्याने आपल्या कुटुंबियांशी फोनवरून संपर्कसुद्धा केला. दुपारी माजरी जिल्हा (चंद्रपूर) जवळील तेलवासा ढोलवासा येथील जंगलात जाऊन आत्महत्या केली.

शिवाजीने आत्महत्या का केली. याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. परंतु आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या मागे दोन मुले,आईवडील व भाऊ, वहिनी असा आप्तपरिवार आहे.

jungleLead StoryMajriNearOfSuicideyouth
Comments (0)
Add Comment