धुनकी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

कीटकनाशक पिऊऩ संपवली जीवनयात्रा

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या धुनकी (कुरई) येथे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि. 29 शनिवारी घडली.

वणी तालुक्यातील धुनकी येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन मारोती पेंदोर (50 )असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे 5 एकर शेत असून बँकेचे आणि एका फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याचे असल्याचे कळाले.

गजाननाने घरी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास विष घेतले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा बराचसा परिवार आहे. गजाननाच्या आत्महत्येने कुटुंबावर संकट कोसळले आहे.

DhunkiLead StoryshirpurSuicide
Comments (0)
Add Comment