संस्थाना एकजूट करुन त्यांना रोजगार देऊ- डॉ. विष्णू उकंडे

भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाची कार्यकारणी गठीत

नागेश रायपुरे, मारेगाव: गाव तेथे संस्था, गाव तेथे कार्यालय, गाव तेथे रोजगार या ध्येयाने विखुरलेल्या तमाम संस्थाना एकजुट करु. त्यांना महासंघाच्यावतीने रोजगार उपलब्ध करुन देऊ. असे प्रतिपादन मारेगाव येथील संकेत महाविद्यालयात झालेल्या तालुका कार्यकारिणी बैठकीत उकंडे यांनी केले. भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे जिल्हा प्रशासन समन्वय समिती तथा जिल्हा संघटक प्रमुख डॉ. विष्णु उकंडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.

तसेच तालुक्यातील तमाम संस्थानी आपापल्या तालुका प्रमुखाशी संपर्क साधून संघटनेत सहभागी होण्याचे आवाहनसुद्धा डॉ.विष्णु उकंडे यांनी केले. यावेळी भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत)च्या या बैठकीत मारेगाव तालुक्याची कार्यकारणी गठीत करण्यात आली.

यावेळी तालुका अध्यक्षपदी नागेश रायपुरे, उपतालुका अध्यक्षपदी मारोती पाचभाई, रामदास आत्राम, शहर प्रमुखपदी विवेक बोबडे, ग्रामीण प्रमुखपदी सजंय जीवने, उपशहर प्रमुख पुष्पा ताकसांडे, ग्रामीणचे गोरखनाथ पाटील यांची मान्यवरांचे हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

 

Lead Storymahasanghnew BodySansthaSwyamsevi
Comments (0)
Add Comment