संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलचा यंदाही 100 टक्के निकाल

विवेक तोटेवार, वणी: वणीतील संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलचा सलग तिसऱ्यांदा 100 टक्के निकाल लागला आहे. यावर्षी शाळेतून दक्षा सचिन अंड्रसकर ही 91.60 टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली आहे. जान्हवी राजू रक्षिया हिने 89.80 टक्के गुण घेत द्वितीय तर आनंदी गुरुदास सातपुते हि 87.20 टक्के गुण घेऊन शाळेतून तृतीय क्रमांकावर आली आहे. वणी शहरातील सर्वोदय चौकात सतिघाट रोडवरील संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल आहे. सोमवारी 10 विचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये वणीच्या संताजी स्कूलचे एकूण 42 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष रमेश येरणे, उपाध्यक्ष ओमप्रकाश निमकर, सचिव धनंजय आंबटकर व सर्व संचालक, शाळेच्या मुख्याधिपिका सीमा कुरेकर व समस्त शिक्षकांकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Lead StorySantaji English Medium School