अपघात: एक ठार तर एक जखमी

सुकनेगाव येथील घटना, परिसरात हळहळ

विवेक तोटेवार, वणी: शनिवार दुपारी 1 वाजताच्या दरम्यान सुकनेगाव येथे दुचाकी व एका अज्ञात वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाला डोक्याला गंभीर इजा झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

निलेश लक्ष्मण येरमे (35) हा मूळचा तालुक्यातील सुकनेगाव या गावातील असून शनिवार दुपारी 1 वाजताच्या दरम्यान निलेश व त्याचा मजूर शेतातून घरी येत होते. अचानक समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत निलेशच्या डोक्याला गंभीर इजा झाली. गावातील लोकांनी व आप्तस्वकीयांनी निलेशला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

निलेशला तीन अपत्य आहेत. शिवाय त्याच्या लहान भावाचे येत्या 12 जून रोजी विवाह असल्याची माहिती आहे. त्याच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात ट्रॅक्टरच्या धडकेमुळे झाला आहे अशी माहिती वणी बुहुगुणीला मिळाली आहे. त्यामुळे याची सविस्तर तपासणी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे.

Lead StorySuknegaon
Comments (0)
Add Comment