शिवणी येथे बंधारा बांधकामाचे भूमिपूजन

जलस्तर वाढवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिवणी (जहाँगिर) येथे असोसिएटेड सिमेंट कंपनी आणि दिलासा संस्थेच्या वतीने दगडी सिमेंट बंधारा बांधकामाचे भूमिपूजन २५ जानेवारीला पार पडले.

शिवणी ग्रामस्थांनी बंधारा बांधकामाची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. त्याअनुषंगाने एसीसीचे अधिकारी विजय खटी आणि दिलासा संस्थेच्या वैशाली खांडीलकर यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. सरपंच आणि ग्रामस्थांसी चर्चा करून जागेची निश्चिती केली. सदर बांधकामाचे भूमिपूजन सरपंच प्रकाश बलकी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

यावेळी दिलासाचे समन्वयक कुणाल तळस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सदर बंधाऱ्यामूळे परिसरातील जलस्तर वाढण्यास मदत होणार असून जनावरांचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचे मत व्यक्त ग्रामस्थांनी केले.

Lead StoryShivni
Comments (0)
Add Comment