शिवसेनेच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी हिमांशू बतरा

पालकमंत्री संजय राठोड यांनी केली नियुक्ती

जब्बार चीनी, वणी: शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी हिमांशू बतरा यांची शिवसेना प्रणीत व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पालकमंत्री संजय राठोड यांनी ही नियुक्ती केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर व युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांच्या मार्गदर्शनात हिमांशू बतरा हे व्यापारी आघाडीचे काम करणार आहे.

व्यापा-यांच्या समस्या सोडवण्यास तत्पर राहणार – हिमांशू बतरा
व्यापा-यांना अनेक समस्या येतात. त्याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष होते. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास टाकत माझ्याकडे जिल्हा संघटक हे पद दिले आहे. त्यामुळे त्यांनी टाकलेला माझ्यावरचा विश्वास मी सार्थ करून दाखवील. व्यापा-यांच्या ज्या काही समस्या असेल त्या 24 तासांच्या आत सोडवण्यात माझा भर राहिल. याशिवाय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व युवा मोर्चा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात पक्ष वाढीवरही भर राहिल.
– हिमांशू बतरा, जिल्हा संघटक व्यापारी आघाडी शिवसेना

व्यापारी व उद्योग क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी व त्यांच्या न्याय व हक्कासाठी शिवसेनेची व्यापारी आघाडी कार्यरत आहे. हिमांशू बतरा यांच्या नियुक्तीमुळे व्यापारी वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या नियुक्तीने व्यापा-यांच्या समस्या सोडवल्या जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

हे देखील वाचा:

अपघातात दोन तरुणांचा मृत्यू, अर्धवन गावात शोककळा

हे देखील वाचा:

रस्ता नको; पण पूल आवर असे म्हणायची वेळ

Lead StoryVyapari Aghadi
Comments (0)
Add Comment