बोरगाव येथील मारोतराव धांडे यांचे निधन

विलास ताजने, वणी:  वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील प्रगतिशील शेतकरी मारोतराव धांडे यांचे दि.२८ बुधवारी सायंकाळी नागपूर येथे उपचारा दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. पोलीस पाटील या पदावर त्यांनी अठ्ठावीस वर्ष  काम केले.

स्पष्ट वक्ता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, जावई, नातवंड असा परिवार आहे

Nidhan warta
Comments (0)
Add Comment