भारिपतर्फे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

कृपाशील तेलंग, वणी: महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त वणीमध्ये भारिपतर्फे ज्योतिबा फुलेंना अभिवादन करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी सम्राट अशोक नगरातील महात्मा फुले चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात भारिपचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील महात्मा फुले चौकात शेकडो भारिप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक महात्मा फुलेंना अभिवादन करण्यास गोळा झाले होते. फुलेंच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भारिपचे ऍड मानकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारिपचे जिल्हा सहसचिव भारत कुमरे, वणीचे तालुकाध्यक्ष मंगल तेलंग, शहर अध्यक्ष प्रशिल उर्फ़ बंटी तामगाडगे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, रमेश तेलंग, अॅड.मानकर, पक्षाचे तालुका उपाध्यक्ष प्रलय तेलतुंबडे, तालुका सचिव किशोर मून, अजय खोब्रागडे, सुधीर पडोळे, इत्यादींनी परिश्रम घेतले.

Lead StoryMahatma Phule
Comments (0)
Add Comment