आधी वस्तूंचा डेमो बघा, नंतरच वस्तू खरेदी करा

प्री बुकिंगवर आकर्षक गिफ्ट व विविध सूट

सुरेश पाचभाई: खरेदी शिवाय दिवाळी अपूर्णच आहे. दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि होम अप्लायन्सेसची ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र अपु-या माहितीमुळे अनेकदा ग्राहकांची फसगतही होते. त्यामुळे वणीत टागोर चौक येथील विठ्ठलदास देवचंद या प्रतिष्ठाणमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि होम अप्लायन्सेसच्या खरेदीसाठी ग्राहकांना डेमो सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात ग्राहकांना टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, एसी, लॅपटॉप, व्हॅक्यूम क्लिनर इत्यादी वस्तूंच्या डेमो बघता येणार आहे. डेमो मुळे ग्राहकांना नेमकी कोणती वस्तू घ्यावी? वस्तू कशी काम करते? इत्यादी माहिती मिळते. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अनेकदा ग्राहकांना वस्तू तर विकत घ्यायची असते. मात्र वस्तूंमध्ये कोणते फंक्शन्स आहेत. ते काम कसे करतात. कुठल्या प्रॉडक्टमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलीये. इलेक्ट्रिकचा खर्च किती येतो. इत्यादी अनेक प्रश्नांचे उत्तर नसते. ग्राहकांनी योग्य तोच प्रॉडक्ट विकत घ्यावा यासाठी विठ्ठलदास देवचंद या शहरातील सुपरिचित प्रतिष्ठाणात डेमो सुविधा देण्यात आली आहे. विठ्ठलदास देवचंद हे 50 पेक्षा अधिक कंपनीचे अधिकृत विक्रेते आहे. त्यामुळे थेट अधिकृत विक्रेत्यांकडून वस्तू विकत घेतल्याने ग्राहकांचा फायदाही मोठ्या प्रमाणात होणार आहे.

पहिले खात्री करा नंतरच वस्तू विकत घ्या
दिवाळीच्या खरेदीच्या आधी ग्राहक केव्हाही दुकानात भेट देऊन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसचा डेमो घेऊ शकतो. यात वस्तूंचा संपूर्ण डेमोच दिला जात नाही तर कुटुंबातील व्यक्ती, बजेट, जागा इत्यादी, फंक्शन इ. गोष्टी लक्षात घेऊन त्यांना योग्य ते प्रॉडक्टही सजेस्ट केले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी एकदा डेमोसाठी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

प्री बुकिंगवर आकर्षक बचत व गिफ्ट
जर डेमो मध्ये ग्राहकांना वस्तू आवडली आणि त्यांनी वस्तूंची प्री बुकिंग (खरेदी आधीची बुकिंग) केल्यास त्यांना त्या वस्तूंवर आकर्षक बचतीची संधी आहे. शिवाय प्री बुकिंगवर एक आकर्षक गिफ्ट ही दिले जाणार आहे. यासह वस्तूंवर ग्राहकांना विविध सूटही दिली जाणार आहे. ईएमआयच्या सुविधेवरही वस्तू खरेदी करता येणार आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर 25 टक्के पर्यंतची बचत ग्राहकांना करता येणार आहे.

विठ्ठलदास देवचंद हे शहरातील टागोर चौक येथील इलेट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेसच्या खरेदीसाठी एक विश्वसनीय असे नाव आहे. शहरातील सर्वात जुने तसेच 100 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले प्रतिष्ठाण आहे. आज या कुटुंबाची तिसरी पिढी हे काम करीत आहे. शहरातील सर्वात मोठे शोरूम म्हणूनही विठ्ठलदास देवचंद या प्रतिष्ठानची ओळख आहे. 2 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना त्यांनी सेवा दिली आहे. खरेदीच्या आधी एकदा ग्राहकांनी फ्रि डेमोसाठी भेट द्यावी असे आवाहन विठ्ठलदास देवचंद (प्रशांत ट्रेडर्स) तर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क – 9822221524 9822278776  9822278747

Lead StoryVitthaldas Devchand