सुशगंगा पॉलिटेकनिक कॉलेजजवळ सापडली डेथ बॉडी

काय आहे मृत्यूमागचं कारण, कुणाची आहे डेथ बॉडी

रवि ढुमणे, वणी: चंद्रपूर येथील नानाजी नगरात वास्तव्यास असलेल्या बस चालकाचा नायगाव शिवारातील सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेज जवळ संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

चंद्रपुरातील नानाजी नगर भागात राहणारे चंद्रभान मारोती ढवस (५४) हे वरोरा डेपोत चालक पदावर कार्यरत होते. बुधवारला सकाळी ९ वाजताचे सुमारास पत्नीला वरोरा येथील बँकेत जातो असे सांगून घरून निघाले. परंतु त्यादिवशी घरी परतलेच नाही. परिणामी पत्नी कांता हिने रामनगर पोलीस ठाण्यात पती हरविल्याची तक्रार गुरुवारी दाखल केली.

वरोरा येथे कामानिमित्त गेलेला पती घरी न परतल्याने कांता काळजीत होती. शुक्रवारी सकाळी चंद्रभान यांचा जावई राहुल देठे यांनी नागपूर येथे शिक्षण घेत असलेल्या धनराज याला तुझे वडील नायगाव शिवारात मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती फोनवरून दिली. धनराज याने तात्काळ वणी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. यात त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे माहीत नसल्याचे सांगून कधी कधी दारू पीत असल्याचे स्पष्ट केले.

चंद्रभानचा नायगाव शिवारात मृत्यू होणे याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळात आहे. या घटनेचा तपास ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांचे मार्गदर्शनात पीएसआय जयप्रकाश निर्मल करीत आहे.

 

Death bodyLead Storysushganga polytechnic
Comments (0)
Add Comment